बी.डी.उबाळे
औसा: औसा तालुक्यातील भादा येथे नुकतेच तिसऱ्या शुद्ध जारचे पाणी फिल्टरचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. आणि होत असलेली गावची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.पण गेल्या पंचवार्षिक योजनेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये असताना माजी उपसरपंच यांनी जागृत देवस्थान नागोबा मंदिरासमोर झालेल्या जाहीर निवडणूक सभा, जाहीरनाम्यामध्ये प्रचारादरम्यान जाहीर भाषणामध्ये “भादेकरांसाठी शुद्ध जारचे पाणी मोफत पणे घरोघरी पुरवठा!”करण्याचे वचन, शब्द मोठ्या मनाने हातवारे इशारे आणि बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत,टाळ्याच्या गजरामध्ये जाहीरपणे दिला होता परंतु पाच वर्षे संपून गेले ते संपत असताना मोफत पाण्याची सुविधा घरोघरी उपलब्ध झाली नाही परंतु भादा येथील मुख्य गाव,आनंद नगर येथील दवाखान्याजवळ आणि नुकताच 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून हा तिसरा शुद्ध जारच्या प्लांटचे उद्घाटन छत्रपती शिवाजीनगर भागातील प्रभाकर स्वामी महाराज मंदिरासमोर करण्यात आले आहे.यामुळे भादा येथील नागरिकांना विविध भागांमध्ये शुद्ध जारचे पाणी उपलब्ध करून दिल्याने भादेकरामध्ये या पानी सुविधेचे स्वागत करण्यात येत आहे.या स्वागता बरोबरच उपसरपंचानी दिलेला जाहीर शब्द हा मोफत घरोघरी जारचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणार हे वाक्य लक्षात येत असून या वाक्याच्या संदर्भात नागरिकांच्या भावना आपोआपच जाहीरपणे दिलेला शब्द या पंचवार्षिक योजनेमध्ये साफ विसरून गेले? त्या बदल्यात विविध ठिकाणी जारची शुद्ध पाणी उपलब्ध करण्यात आले.तरीही अनेक नागरिकांच्या मनी “क्या हुआ तेरा वादा…” हे वाक्य सतत आठवणींमध्ये येत असल्याची चर्चा सध्या भादेकरांमध्ये जोरदार सुरू असल्याचे समजते….
या उद्घाटन प्रसंगी ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच, माजी ग्राम पंचायत सदस्य, भादा ए पी आय, प स सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
