एक महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्याने २० फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू

एक महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्याने २० फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू

बीड दि.२२ (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील मौजे शिवणी हद्दीतील गट क्र. ६६२ मधील ताब्यात असलेली गायराण जमिनीवरील घर शेड पाडून लोखंडी पत्रे, अँगल तसेच उपजीविकेच्या वस्तू, साहित्य संसार उपयोगी वस्तू चोरी दरोडा घालून लंपास केल्याप्रकरणी माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे मागील एक महिन्यापासून बेमुदत उपोषण सुरू होते. मात्र प्रशासनाने कसलीही दखल न घेतल्याने २० फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
मौजे शिवणी हद्दीतील गट क्र.६६२ मधील जमीन अनेक वर्षांपासून माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांच्या ताब्यात आहे. याठिकाणी ते उपजिविकेसाठी पेरणी करतात. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून ते आपली उपजीविका करतात. याठिकाणी त्यांनी लोखंडी अँगल असलेले पत्र्याचे शेड घर बांधले होते. मात्र आरोपींनी दोन दिवस गॅस कटर ने पत्र्याचे शेड आणि लोखंडी अँगलने कट केले. शेड घर पाडतानाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यामुळे या व्हिडिओद्वारे त्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती. मात्र अद्याप पर्यंत त्या आरोपींवर कसल्याही कारवाई न झाल्यामुळे माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी मौजे शिवणी येथे मागील एक महिन्यापासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.
मात्र आता त्यांनी हे आंदोलन अधिकच तीव्र केलं आहे. २० फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. अन्नत्याग करून उपोषण करत आहेत. तरी देखील अद्याप पर्यंत पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने या उपोषणाची दखल घेतलेली नाही. उपोषण करणाऱ्या व्यक्तीजवळ.उपोषणस्थळी पोलीस किंवा आरोग्य विभागातील अधिकारी असणे आवश्यक असताना सुद्धा त्याठिकाणी कोणीच आलेलं नाही. देशसेवा करणाऱ्या व्यक्तीला प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने सामान्य नागरिकांतून शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *