परळी :
“मराठा भवन” व “बाल शिवबासह राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा” याविषयी सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वै. नगर परिषद समोर सुरु असलेले बेमुद्दत ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार दिनांक ११ मे २०२६ पासून नगर परिषद कार्यालया समोर बेमुद्दत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
परळी शहरात “मराठा भवन” उभारण्यासाठी जागेसंदर्भात तसेच राजमाता जिजामाता उद्यानातील बाल शिवबासह माँसाहेब जिजाऊंचा पुतळा बसवण्याच्या विषयी नगर पालिकेकडे अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला जात असून सदरील मागणी जोपर्यंत मान्य केली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे आंदोलन कर्त्याकडून सांगण्यात आले आहे.
