परळीच्या विकासासाठी आणि स्मृती जतनासाठी ‘दादां’च्या शिलेदाराचे मोठे पाऊल उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंची घेतली भेट ! *_परळीत ४८ कोटींचा ‘काँक्रीट’ घोटाळा? नद्यांचे अस्तित्व पुसण्याचा घाट माजी नगराध्यक्षांची पालकमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा_*

परळीच्या विकासासाठी आणि स्मृती जतनासाठी ‘दादां’च्या शिलेदाराचे मोठे पाऊल उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंची घेतली भेट !

*_परळीत ४८ कोटींचा ‘काँक्रीट’ घोटाळा? नद्यांचे अस्तित्व पुसण्याचा घाट माजी नगराध्यक्षांची पालकमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा_*

​”पर्यावरण वाचवा, परळी वाचवा” असा सूर आता शहरातील जागरूक नागरिकांमधून उमटत आहे.

​परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

परळी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृती चिरंतर जपण्यासाठी स्व. अजितदादांच्या नावे प्रस्तावित शैक्षणिक प्रकल्पांबाबत आज दिनांक 14 मे रोजी सकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुमित्राताई पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यांना निवेदनाद्वारे विविध मागण्या सादर करण्यात आल्या.

​परळी शहरातील नैसर्गिक नाले आणि सरस्वती नदीचे अस्तित्त्व धोक्यात आणणारा ४८ कोटी रुपयांचा सिमेंटीकरणाचा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा, अशी आग्रही मागणी माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथराव देशमुख यांनी केली आहे. याबाबत त्यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांना लेखी निवेदन दिले असून, या पत्राची प्रत मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनाही पाठवण्यात आली आहे.

परळी नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शहरातील सरस्वती नदीसह इतर मोठ्या नैसर्गिक नाल्यांच्या दोन्ही बाजूने सिमेंटच्या भिंती आणि तळाशी पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्याचा ४८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र, या प्रस्तावामुळे शहराच्या नैसर्गिक जलस्त्रोतांचे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

​मतदारसंघात सध्या अनेक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत, मात्र यातील काही कामांच्या दर्जाबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. “शासकीय निधीचा विनियोग योग्य पद्धतीनेच झाला पाहिजे,” ही भूमिका मांडत, मतदारसंघात होत असलेल्या बोगस कामांची तातडीने चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दोषींवर कठोर कारवाई करून कामांचा दर्जा सुधारण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

*स्वखर्चातून उभारणार स्वर्गीय अजितदादा पवार यांचा पुतळा*

​परळी शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरात त्यांचा भव्य पुतळा बसविण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. विशेष म्हणजे, हा पुतळा दीपक देशमुख हे स्वखर्चातून बसविणार असून, त्याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.

*​पशुवैद्यकीय व कृषी विद्यालयाला नाव देण्याचे साकडे*

​परळीत नव्याने मंजूर झालेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाला ‘स्वर्गीय अजितदादा पवार साहेब’ यांचे नाव देण्यात यावे, असे निवेदनही यावेळी देण्यात आले. शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ओळख भावी पिढीला व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

​आता या पत्रावर पालकमंत्री आणि प्रशासन काय ? भूमिका घेणार, याकडे संपूर्ण परळी शहराचे लक्ष लागले आहे.

____

*नद्यांच्या तळाशी काँक्रीट घातल्यावर पाणी जिरणार कसे?* –

​परळी नगरपालिकेचा ४८ कोटींचा हा प्रकल्प म्हणजे केवळ ‘निधी हडपण्याचा’ घाट आहे. राज्य शासन एकीकडे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही पर्यावरणपूरक मोहीम राबवत असताना, दुसरीकडे परळीतील नैसर्गिक नद्यांच्या तळाशी काँक्रीट घालून जलपुनर्भरण प्रक्रिया कायमची बंद केली जात आहे.
केवळ ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी निसर्गाचा बळी दिला जात आहे. हा घातक प्रकल्प रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

​— दीपक रंगनाथराव देशमुख
(माजी नगराध्यक्ष, परळी वैजनाथ)
______

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *