येरवड्यातील अंगणवाडीत पोषण आहाराच्या नावाखाली दिले जात कीड लागलेले धान्य.

येरवड्यातील अंगणवाडीत पोषण आहाराच्या नावाखाली दिले जात कीड लागलेले धान्य.

येरवड्यातील अंगणवाडीत पोषण आहाराच्या नावाखाली दिले जात कीड लागलेले धान्य..

पुणे- येरवडा परिसरातील महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान मुलाना पोषण आहार म्हणून बंद पाकिटात डाळ, चना आणि गहू देण्यात येतात मात्र या धान्याचा दर्जा एवढा निकृष्ट दर्जाचा आहे हे जय जवान नगरमधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अ.क्र १११ अंगणवाडीत स्पष्टपणे दिसून आले. याबाबत पीडित पालक विशाल शेलार यांनी आम आदमी पार्टी कडे मदत मागितली. लहान मुलांना दिलेलं धान्य हे गुरेढोरे यांना सुद्धा देता येणार नाही. हा एकप्रकारे पोषण आहाराच्या नावाखाली लहान मुलांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे

यावेळी पुणे शहर संघटक सहमंत्री मनोज शेट्टी, पुणे शहर उपाध्यक्ष महिला आघाडी श्रद्धा शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते गणेश घायमुक्ते आणि पीडित पालक विशाल शेलार यांनी कीड लागलेल्या धान्याची पोलखोल महिला बाल कल्याण झोन प्रोजेक्ट अधिकारी सौ. मनीषा बिरादार, कर्मचारी व ठेकेदाराला सिद्ध करून दाखवली

*मनोज शेट्टी
संघटन सहमंत्री, आम आदमी पार्टी, पुणे शहर*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *