*परळीत कोरोना वॉरियर्सचा धनंजय मुंडेंच्या हस्ते होणार गौरव!* *सेवाधर्म उपक्रमांतर्गत सोमवारी सेवा गौरव कृतज्ञता व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन*

परळी (दि. 20) —- : परळी येथील डॉक्टर्स, पॅरा मेडिकल स्टाफ, फार्मासिस्ट, महसूल प्रशासन, पोलीस, आशा वर्कर्स, शिक्षक, आशा वर्कर्स, पत्रकार तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, स्मशान भूमी रक्षक, रुग्णवाहिका चालक आदी सर्वांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम केले. या सर्व कोरोना वॉरियर्सचा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते सोमवारी गौरव करण्यात येणार असून यानिमित्ताने स्नेहभोजन कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्व कोरोना वॉरियर्सनी अहोरात्र काम करत या लाटेला थोपवण्यासाठी अविस्मरणीय योगदान दिले, त्यांच्या या योगदानाबद्दल सेवा गौरव कृतज्ञता समारोह सोमवारी सायंकाळी 6 वाजता शहरातील हलगे गार्डन मंगल कार्यालय येथे कोविड विषयक नियमांची खबरदारी घेऊन आयोजित करण्यात आला असून, यांतर्गत सर्व कोविड योद्ध्यांचा ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

194 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *