_उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त_ *15 जुलै ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेआरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी…. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान अबालवृद्ध बंधु भगिनींकरीता विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. यापूर्वी “आधार महोत्सव”,”स्वाभिमान महोत्सव” तसेच लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन “सेवासप्ताह” घेण्यात आला.यावर्षी 15 जुलै ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेआरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी सर्वांनी कोरोनाच्या प्रादुर्भावात दुसऱ्या लाटेत अतिशय बिकट परिस्थीतीचा सामना केला.अनेक जीवाभावाची व्यक्तीमत्वे कोरोनाने आपल्यापासून दुरावून नेली.विद्यमान परिस्थितिमध्ये देखील अनेकजण दवाखान्यात उपचारार्थ जावू शकत नाहीत,ही बिकट परिस्थिती आहे.त्यामुळे दोन्ही लाडक्या नेत्यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिच्या वतीने आरोग्यदायी उपक्रम “आरोग्य सेवा सप्ताह”आयोजित केला असून यात विविध आरोग्यविषयक तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवार दिनांक 15 जुलै रोजी ना.धनंजय मुंडे “अभिष्टचिंतन सोहळा” संजय गांधी निराधार योजनेच्या 1500 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप व महात्मा फुले आरोग्य योजनेच्या कार्ड नोंदणीच्या शिबीराचे उद्घाटन.शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी धनंजय मुंडे आरोग्य मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरात विविध 100 भागात संपन्न होणाऱ्या मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीराचा शुभारंभ. शनिवार 17 जुलै रोजी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर.रविवार दिनांक 18 जुलै रोजी सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचे मोफत नेत्र तपासणी शिबीर.सोमवार दिनांक 19 जुलै रोजी दै.लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने “रक्ताचे नाते” या उपक्रमात महारक्तदान शिबीराचे आयोजन.मंगळवार व बुधवार दिनांक 20 व 21 जुलै रोजी सर्वांसाठी मोफत औषधीसह सर्वरोगनिदान शिबिर.गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा,आरोग्यसेवक व वृक्षमित्रांचा सेवागौरव तसेच विविध लोकोपयोगी उपक्रम या उपक्रमाचा समावेश आहे. आरोग्य सेवासप्ताह मधील सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकरी, सरचिटणीस अनंत इंगळे, युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, युवा शहराध्यक्ष सय्यद सिराज, महिला आघाडीच्या अर्चनाताई रोडे,युवती शहराध्यक्ष पल्लवी भोयटे, युवती तालुकाध्यक्ष सुलभा साळवे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *