_उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त_ *आरोग्य सेवासप्ताह: आज पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचे नेत्ररोग तपासणी शिबिर
परळी वैजनाथ, प्रतिनिधी…. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये आज दि.१८ रविवार रोजी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे नेत्ररोग तपासणी शिबिर होणार आहे याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रविवार १८ जुलै रोजी सकाळी ९ वा.पासुन जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीमध्ये नेत्ररोग तपासणी शिबिर होणार आहे.लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.आरोग्य सेवासप्ताह च्या माध्यमातून ही मोठी उपलब्धी असुन अधिकाधिक नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. या नेत्ररोग तपासणी शिबिराचा व आरोग्य सेवासप्ताह मधील सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकरी, सरचिटणीस अनंत इंगळे, युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, युवा शहराध्यक्ष सय्यद सिराज, महिला आघाडीच्या अर्चनाताई रोडे,पल्लवी भोयटे,सुलभा साळवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले