_उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित_ *सेवासप्ताहातील विविध आॅनलाईन स्पर्धांचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवारी पारितोषिक वितरण*

परळी वैजनाथ/ प्रतिनिधी… राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध आॅनलाईन स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवार दि.११ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे. सेवा सप्ताह काळात विविध अभिनव आॅनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. परळीत प्रथमच आयोजित व्यापक ऑनलाईन स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळाला.यामध्ये परळी पंचक्रोशीतील विविध ठिकाणांचे फोटो फेसबूक माध्यमातून प्रकाशित करण्यात आले. एक्सप्लोरिंग परळी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.अतिशय रोचक व रोमहर्षक ही स्पर्धा ठरली. त्याचप्रमाणे आजा नच ले डान्स स्पर्धा, बजाते रहो वादन स्पर्धा,मेरी आवाज सुनो गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या.या स्पर्धांना स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाची सर्वांना उत्सुकता लागली होती. या स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम रविवारी सकाळी ११ वा.लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ.संजय दौंड , विशेष उपस्थिती नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सोशल डिस्टंन्सिंग व कोरोनाविषयक नियमांचे पालन करून उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस परळी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *