ना. दानवे यांच्या संकल्पनेतून प. स. सदस्यांनी केले मास्क वाटप

जालना (प्रतिनिधी)- जगावर कोरोनो संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिवसे दिवस वाढत असुन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेनी प्रूफ केलेलं सॅनिटायझर तसेच मास्क ग्रामीण भागात आ. संतोष दानवे, कोंबा उपसभापती भास्कर दानवे यांच्याकडून कडवंची गण पं. स. सदस्य कैलास उबाळे यांनी नंदापुर येथे गुरूवार ता.7 मास्कचे वाटप करण्यात आले.
कोरोनो रोगाचा मुकाबला करताना खबरदारी म्हणुन मास्कचे वाटप करुन सामाजिक बांधिलकीचा उपक्रम जालना तालुक्यातील नंदापुर येथील अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या दुकानदार ग्रामपंचायत कर्मचारी, प्रशासन, सफाई कामगार महीला बचत गट,  दवाखाना आदी ठिकाणी यांच्या कुटुंबियांना पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी नंदापुर गावकरी मंडळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनासारख्या जैविक महामारीत  बांधवांचे आरोग्यहित जपण्याच्या उदात्त हेतूने प्रतिबंधात्मक उपाययोजना व खबरदारी म्हणून  मास्क वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित कैलास खरात,  कैलास आढाव,  कैलास थोरात,  सुरेश खरात, नागेश अंबिलवादे,  श्री सदगुरू सदानंद हॉटेल संचालक विनोद उबाळे, सुरेश खरात, रामदास खरात, सोपान उबाळे, हरिदास वाघमारे आदीची उपस्थिती होती.

196 Views

Leave a Reply

Your email address will not be published.