विधानपरिषदेची हुकलेली संधी यावेळी अ‍ॅड. नाझेर काझी यांना मिळणार?

जालना (प्रतिनिधी) – गेल्या पंचवार्षीक मध्ये विधानपरिषदेच्या (राज्यपाल नियुक्त) सदस्य म्हणून बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांची एैनवेळी पक्षाकडून संधी हुकल्याने यावेळेस मात्र पक्ष श्रेष्ठी त्यांच्या एकुण कार्याची दखल घेवून त्यांना योग्य  न्याय देतील अशी बुलढाणासह विदर्भामध्ये जोरदारपणे चर्चा सुरू असतांना राष्ट्रवादीचे नेते सामाजिक न्यायाच्या दृष्टीने यावेळेस त्यांनी मराठवाड्याला आवर्जुन न्याय दिला असल्यामुळे अ‍ॅड. नाझेर काझी यांचे नाव निश्‍चित होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या पंचवार्षीक विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यपदी विदर्भातुन खाजा बेग यांची राष्टवादी पक्षाने नियुक्ती केली होती. परंतू अ‍ॅड. नाझेर काझी यांची विधानपरिषदेच्या सदस्य पदी संधी हुकली तरी त्यांनी मात्र स्वतःला पक्षासाठी झोकून दिल्याचे अनेक घटना पक्षश्रेष्ठी समोर आलेल्या आहेत. पक्षाने त्यांना जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जवाबदारी दिल्यानंतर त्यांनी पक्षासाठी अहोरात्र प्रयत्नाची पराकष्टा केली आणि पक्षाला आपल्या कुशल संघटनेची चुणूक दाखवून दिली. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तत्कालीन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजा मतदार संघातून निवडणुक लढविली नाही. त्यामुळे त्याठिकाणी शिवसेनेचे आमदार म्हणुन शशीकांत खेडेकर हे निवडुन आले. अशा कठीण परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद सांभाळतांना त्यांना अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले. पक्षाचे भरभक्कम बाजु उभारण्यासाठी त्यांना कसोसीचे प्रयत्न करावे लागले. पक्ष आणि कार्यकर्ते यांना एकसंघ ठेवून गेल्या निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीचे आमदार राजेद्र शिंगणे या भागातून निवडुन आले आहे. अ‍ॅड. नाझेर काझी यांना यथोचित न्याय मिळावा म्हणुन बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील जनमानसाची भावना आहे. अ‍ॅड. नाझेर काझी हे आपल्या राजकीय जिवनामध्ये त्यांनी शरदचंद्र पवार यांच्या विचाराशी समरसहून राजकीय वाटचाल सुरू केलेली आहे. काँग्रेस पक्षामध्ये श्री पवार असतांना त्यांचे समर्थक म्हणून सर्वश्रृत आहे. काँग्रेस पक्षातून वेगळे होऊन श्री पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हाही अ‍ॅड. काझी यांनी श्री पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहीले. अ‍ॅड. नाझेर काझी यांच्या घराण्याचा राजकीय वारसा राहीलेला आहे. त्यांचे आजोबा श्रीमती इंदीरागांधी, यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचे थेट संबंध होते. यामुळे अ‍ॅड. काझी यांनी देखील काँग्रेस पक्षामधील अनेक दिग्गज लोकांशी जवळीकता साधली होती. कॉग्रेस पक्षाचे नेते मुकुल वासनीक यांच्याशी त्यांचे घनीष्ट संबंध होते. परंतू त्यांनी श्री पवार यांच्या विचारांशी स्वार्थासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. मंत्री राजेद्र शिंगणे आणि अ‍ॅड. काझी यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध असून अ‍ॅड. काझी हे बुलढाणा जिल्ह्यात डॉ. शिंगणे यांचे विश्‍वासू आणि कट्टर समर्थक असल्यामुळे तेही अ‍ॅड. काझी यांना विधानपरिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकुण सात विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी तीन भाजपा, दोन शिवसेना, एक काँग्रेस, एक राष्ट्रवादी असे संख्याबळ आहे. याजिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व व पक्षसंघटना मजबुत करण्यासाठी अ‍ॅड. काझी यांना निश्‍चितपणे संधी देण्यात येईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
डॉ. वजाहात मिर्झा हे या काँग्रस पक्षाच्या कार्यकर्त्याला विदर्भातून काँग्रेस पक्षाने विधानपरिषदेच्या सदस्यपदी संधी दिल्यावर संपुर्ण विदर्भामध्ये त्यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने अ‍ॅड. नाझेर काझी यांना विधानपरिषेच्या सदस्य पदाची संधी द्यायला हवी होती अशी चर्चा एैकवयास आली होती. विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोणातून यावेळेस अ‍ॅड. नाझेर काझी यांची विधानपरिषदेच्या सदस्यपदी वर्णी लावतील अशी जनभावना लोकांमध्ये असल्याचे दिसून येते.

113 Views

Leave a Reply

Your email address will not be published.