महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलची तहसीलदारांना मारहाण, गुन्हा दाखल

सांगली : तहसीलदाराला मारहाण केल्याप्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास चंद्रहार पाटीलने विटा तहसिलदारांना मारहाण केली होती.विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी चंद्रहार पाटीलच्या अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त केल्या होत्या. तसेच याप्रकरणी चंद्रहार पाटीलला साडेसात लाखांचा दंडही ठोठावला होता. या वाळू गाड्यांवर ठोठावलेला दंड कमी करा, ही मागणी अनेक दिवसापासून चंद्रहार पाटील करत होता. मात्र तहसीलदार यांनी कायदेशीररित्या दंड भरा, मी दंड कमी करू शकत नाही असं सांगितलं होतं.तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याबद्दल हा राग मनात धरून रविवारी दुपारच्या सुमारास विटा तहसील परिसरातच चंद्रहार पाटील आणि त्याच्या एका साथीदाराने त्यांना मारहाण केली. अखेर ऋषिकेश शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिली.

288 Views

Leave a Reply

Your email address will not be published.