माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव घरीच साजरा करा – आर्यवैश्य समाज बांधवांचे आवाहन

परळी : – आर्य वैश्य समाजाची कुलस्वामिनी माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव रविवार दि ०३/०५/२०२० रोजी आहे. प्रतिवर्षी संपूर्ण देशभरात परळी शहरातही हा जन्मोत्सव मोठ्या हर्षउल्हासा मध्ये साजरा केला जातो. पण या वर्षी कोरोना सारख्या वैश्विक महामारी संकटा मुळे संपूर्ण देशभरात संचार बंदी लागु आहे. त्या मुळे प्रशासनाला सहकार्य करणे आपले प्रथम कर्तव्य आहे म्हणून यंदाचा जन्मोत्सव आर्यवैश्य समाज बांधवांनी घरीच साजरा करावा.
समाज बांधवांनी संपूर्ण नियमांचे पालन करत सकाळी ९ ते १२ या वेळे मध्ये आपल्या घरामध्येच वासवी कन्यका परमेश्वरी मातेची प्रतिमा पुजन करुन ,घरा समोर रांगोळी काढून घरावर ध्वजपताका लावुन जन्मोत्सव साजरा करावा.समस्त विश्वाला या कोरोना महामारीतुन मुक्त करण्याचे साकडे घालावे असे आवाहन महासभा अध्यक्ष नंदकुमारजी गादेवार, जिल्हा कार्कारीनी, आर्य वैश्य विश्वस्त परळीचे अध्यक्ष विकासदादा डुबे,नागनाथजी पारसेवार, बीड जिल्हा उपाध्यक्ष राजेश कौलवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.घरात रहा सुरक्षित रहा या तत्वावर प्रशासनाला सहकार्य करण्याचेही त्यांनी सांगितले आहे.

32 Views

Leave a Reply

Your email address will not be published.