बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न

बीड : दि. १ मे २०२० महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर आजचा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी सकाळी ठीक ८.०० वा. ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित कुंभार, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. हर्ष पोद्दार यांसह महत्वाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

140 Views

Leave a Reply

Your email address will not be published.