राज्यात कोरोना बाधित १२८२ रुग्ण बरे होऊन घरी ; राज्यात आज ५२२ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ८५९० – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधीत ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख २ हजार ५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९,३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.आज राज्यात २७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे १५, अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू हे दिनांक २० ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत.
आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एच आय व्ही आणि आणखी एक रुग्णाला कर्करोग होता. 
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)मुंबई महानगरपालिका: ५७७६ (२१९)ठाणे: ४० (२) ठाणे मनपा: २९५ (४)नवीमुंबई मनपा: १३५ (३)कल्याण डोंबिवली मनपा: १४५ (३)उल्हासनगर मनपा:भिवंडी निजामपूर मनपा: १४मीरा भाईंदर मनपा: १२१ (२)पालघर: २५ (१)वसईविरार मनपा: १२१ (३)रायगड: १८पनवेल मनपा: ४३ (१)ठाणे मंडळ एकूण: ६७३५ (२३८)नाशिक: ४नाशिक मनपा: १९मालेगाव मनपा:  १२३ (१२)अहमदनगर: २६ (२)अहमदनगर मनपा: १६धुळे: ४८(२)धुळे मनपा: १७ (१)जळगाव: १८ (४)जळगावमनपा: २ (१)नंदूरबार: ११ (१)नाशिक मंडळ एकूण: २४४ (२३)पुणे:५८ (३)पुणे मनपा: ९६९ (७४)पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)सोलापूर: ६सोलापूर मनपा: ५९ (५)सातारा: २९ (२)पुणे मंडळ एकूण: ११९३ (८७)कोल्हापूर: ७कोल्हापूर मनपा: ४सांगली: २६सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)सिंधुदुर्ग: १रत्नागिरी: ८ (१)कोल्हापूर मंडळ एकूण: ४७ (२)औरंगाबाद:१औरंगाबाद मनपा: ५१ (६)जालना: २हिंगोली: ८ परभणी: ०परभणी मनपा: १औरंगाबाद मंडळ एकूण: ६३ (६)लातूर: १० (१)लातूर मनपा: ०उस्मानाबाद: ३ बीड: १नांदेड: ०नांदेड मनपा: ३लातूर मंडळ एकूण: १७ (१)अकोला: ११ (१)अकोला मनपा: १८अमरावती: १अमरावती मनपा: २१ (७)यवतमाळ: ६२बुलढाणा: २१ (१)वाशिम: १ अकोला मंडळ एकूण: १३५ (९)नागपूर: ४नागपूर मनपा: १२३ (१)वर्धा: ०भंडारा: १गोंदिया: १चंद्रपूर: ०चंद्रपूर मनपा: २गडचिरोली: ०नागपूर मंडळ एकूण: १३१ (१)इतर राज्ये: २५ (२)एकूण: ८५९०  (३६९)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५७२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७८६१  सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ३२.२८ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

















48 Views

Leave a Reply

Your email address will not be published.