581 रूपयात खरेदी करा आता आपले गॅस सिलेंडर…!
मुंबई : लॉक डावूनच्या काळात सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा निर्णय पेट्रोलियम मंत्रायलाने घेतला आहे,घरगुती गॅस चे दर तब्बल 161 रुपयांनि कमी झाले असून आता गॅस केवळ 581 रुपयांना मिळणार आहे .
देशव्यापी लॉकडाऊन आणि मे महिन्याच्या पहिल्या तारखेलाच सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील इंधन मार्केटिंग कंपन्यांनी (एचपीएल, बीपीसीएल, आयओसी) विना सबसिडीच्या एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट केली आहे. 14.2 किलोच्या विना सबसिडी गॅस सिलेंडरचे दर दिल्ली येथे 162.5 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे नव्या किंमतीत घट होऊन सिलेंडरचे दर 581.50 रुपयांवर आले आहे. तसेच 19 किलोच्या सिलेंडरचे दर 1029.50 आहे.
जाणून घ्या राज्यातील एलपीजी सिलेंडरच्या किंमती
आयओसीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथे 14.2 किलोचे विना सबसिडी सिलेंडरच्या किंमतीत घट होऊन 581 रुपयांवर आले आहे. आधी या सिलेंडरचे दर 744 होते.