जनक्रांती सेनेची परळीतील गरजुवंतांना मदत; आपणच माझी प्रेरणा, मी केवळ निमित्त-बबनभाऊ गित्ते

परळी : जनक्रांती सेनेच्या वतिने लॉकडाऊनमध्ये ग्रामिण भागात जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहचविल्यानंतर आज परळी शहरातील विविध भागातही जीवनावश्यक वस्तूंचे गरजूंना वाटप करण्यात आले. दरम्यान आपण माझी प्रेरणा आहात, आपणच मला नेहमीच शक्ती देत आला आहात मी केवळ निमित्त आहे अशी प्रतिक्रिया यावेळी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांनी दिली.जनक्रांती सेनेच्या वतिने आज परळी शहरातील विविध भागात अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये या दृष्टीकोनातून पहिल्या टप्यात तालुक्यातील 25 पेक्षा अधिक गावात जनक्रांती सेनेच्या वतिने संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांनी आपल्या सहकार्यामार्फत मदत पोहचवली होती. आज परळी शहरातील श्री खंडोबा मंदिर, किर्तीनगर, कृष्णानगर, सावतामाळीनगर, सिद्धेश्वरनगर, गंगासागरनगर, अशोकनगर, आंबेडकरनगर, नागसेननगर, वाल्मीकीनगर व हालगे गल्ली या भागात जीवनावश्यक वस्तूंचे अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी जनक्रांती सेनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 
आपणच प्रेरणा देतातसामाजिक क्षेत्रात काम करीत असतांना अनेकांनी घालून दिलेल्या आदर्शवाटेवर मी चालत आहे. आपल्याकडूनच मला अशा कामांची प्रेरणा मिळाली असून भविष्यातही दुर्देवाने असे काही संकट निर्माण झाले तर मी आपल्यासोबत सदैव कायम राहील.बबनभाऊ गित्तेसंस्थापक अध्यक्षजनक्रांती सेना

113 Views

Leave a Reply

Your email address will not be published.