ए. पी.एल.केशरी शिधापञिकाधारक यांना स्वस्त धान्य वितरण होणार-डॉ.गोरे

माजलगाव : तालुक्यातील सर्व १७८ रास्तभाव दुकानावर ए.पी.एल.केशरी शिधापत्रिकाधारक यांना शासनाने गहू व तांदुळ रास्तभाव दुकानावरुन गहू प्रती व्यक्ती ३ किलो (दर रु . ८ / प्रती किलो) तसेच तांदुळ प्रती व्यक्ती २ किलो (दर रु . १२ / – प्रतीकिलो) या दराने उपलब्ध करुन दिलेला असुन तहसील कार्यालय माजलगाव कडून रास्तभाव दुकानदार यांना माहे मे २०२०चे नियतन देण्यात आलेले आहे . सदर धान्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने माहे में २०२० व जून २०२० महिन्यासाठीचे उपलब्ध करुन दयावयाचे आहे . सदर धान्य हे ज्या लाभार्थी यांची ई- पोस मशिनवर ऑनलाइन नोंद नाही परंतू त्यांचेकडे ए. पी .एल केशरी शिधापत्रिका आहे अशाच लाभार्थी यांना देय आहे . या धान्याचे वितरण करताना जिल्हाधिकारी बीड यांनी ई झी फॉर्मस नावाने मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे . धान्य वितरणामध्ये पारदर्शकता आणणे तसेच लाभार्थी यांची सर्व माहिती ई झी फॉर्मसव्दारे ऑनलाइन संग्रहीत करुन ठेवण्याचा या मागे उद्येश आहे. मा.जिल्हाधिकारी बीड यांचे सुचनेनुसार माजलगाव तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार व रास्तभाव दुकानावर नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी यांना या कसा करावयाचा या बाबतचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या व्दारे या योजनेतील सर्व पात्र लाभार्थी यांना सुचित करण्यात येते की, त्यांनी त्यांचे धान्य उचल करताना ई झी  फॉर्मस या मोबाईल अॅप व्दारेच आपले नांव नोंदवून आपले धान्याची उचल करावी. तसेच या व्दारे सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, सध्या मा. जिल्हाधिकारी बीड यांनी फौजदारी प्रक्रीया संहितेचे कलम 144 लागू केलेले असल्यामुळे त्याचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे . अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरी थांबावे. रास्तभाव दुकानावर टोकन पध्दतीने धान्य वितरण करण्यात येणार असल्यामुळे टोकन पध्दतीनेच धान्य घ्यावे. गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सोशल डिसटंनसिंग चे पालन होईल याची खबरदारी घेण्यात यावी असे तहसिलदार डॉ प्रतिभा गोरे यांनी प्रसिध्दी पञकद्वारे कळविले आहे.

29 Views

Leave a Reply

Your email address will not be published.