अंजली कुलकर्णी- बेले यांचे निधन

बीड: बीड शहरातील श्रीराम नगर येथील  रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षिका अंजली अशोकराव कुलकर्णी -बेले  (लिंबागणेशकर)  यांचे शनिवारी पहाटे एक वाजता औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात मेंदुच्या आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६१ वर्षाचे होते .  जिल्हा पारिषदेच्या शाळेत त्या बेलेबाई या नावाने परिचीत होत्या.त्यांच्या पार्थिवावर बीड शहरातील अमरधाम स्मशानभूमीत  सकाळी साडेनऊ वाजता शोकाकुल वातावरणात  अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, सून, नातवंडे ,दोन मुली  जावई असा परिवार आहे. बीड येथील  जायकवाडी पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ  लिपीक अशोक वसंतराव  कुलकर्णी यांच्या त्या पत्नी होतं

33 Views

Leave a Reply

Your email address will not be published.