बिलोली शिक्षकांचा वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी 3 लाख 25 हजार गोळा

कुंडलवाडी : कोरणा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि  त्यासाठी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तपणे उचलावयाची पाऊले लक्षात घेता बिलोली येथील शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील सर्व केद्रातील शिक्षणविस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख व जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शिक्षक,शिक्षिका यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्या अनुषंगाने बिलोली तालुका शिक्षकांचा वतीने 3 लाख 25 हजार रूपये मुख्यमंत्री सहायता निधी जामा करण्यात आले व ते गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी यांना सर्वांचा उपस्थित सुपूर्द करण्यात आले.बिलोली तालूक्यातील मुख्यमंत्री साह्यता निधी म्हणून आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम होय.
यासोबत गरजूवंताना जिवनावश्यक वस्तू देण्यात आले आहे.बिलोली तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि संस्था तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते आपापल्या क्षमतेप्रमाणे इतरांना मदत करत असतानाचे दिसायला मिळत आहे.तालुक्यातील शिक्षकांनीही याकामी आपले योगदान प्रदान केले आहे.तालूका गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील सर्व शिक्षकांना नुकतेच आवाहन करण्यात आले होते की स्वयंस्फूर्तपणे शक्य असेल तेवढे कोरोना मुख्यमंत्री सहायता निधी साठी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षण विभागाच्या योग्य समन्वय आणि  शिक्षक संघटनांच्या पुढाकारामुळे तालुक्यातील आतापर्यंतची सर्वाधिक मोठी निधी तीन लाख पंचवीस हजार रुपये बिलोली तालूक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख जिल्हा परिषद व खाजगी संस्थेच्या शिक्षकांचा वतीने जमा करण्यात आले आहे.व ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी गटशिक्षणाधिकारी हमिद दौलदाबदी यांना सुपूर्द करण्यात आहे.तसेच यावेळी गरजूंना अन्नधान्याचे कीट ही वाटप करण्यात आले आहेत.यावेळी गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी , ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर, शिक्षण विस्तार अधिकारी भैरवाड , शंकरराव हमंद, केंद्रप्रमुख कौटकर , संघटना पदाधिकाऱी बंडू पाटील भोसले, बालाजी गेंदेवाड,संजय गंजगुडे, शेख सलीम,मारोती गायकवाड, शंकर हासगुळे,डी.सी.सोनकांबळे,यासह यादव सले,रावजीवार,शेख,बैलके,पाशा,मंगनाळे,प्रभू नाथ देशमुख, निरडवार, मंगनाळे, बरबडे,व बिलोली शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते. या सबंधी गटसाधन केंद्रात झालेल्या बैठकीत योग्य अंतर ठेवून गटशिक्षणाधिकारी याच्या सह शिक्षक नेत्यांनी आणि उपस्थित पत्रकारांनी आपले मत व्यक्त केले. शिक्षकांनी दाखवलेल्या दातृत्वाची आणि तालुक्यातील सुयोग्य समन्वयाची बाब प्रकट करण्यात आली. भविष्यात शिक्षकांनी ज्ञानवर्धक ध्वनीचित्रफिती च्या माध्यमातून जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा असेही यावेळी चर्चा करण्यात आली. 

117 Views

Leave a Reply

Your email address will not be published.