मंठ्यात पोलीसांची दारू अड्ड्यावर धाड

मंठा : मंठा शहरातील कैकाडी मोहल्ल्यात पोलीस निरीक्षक विलास निकम यांच्या पथकाने धाड टाकून गावठी हातभट्टीसाठी मोहसडवा व दारूसह ६५ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
सर्वत्र दारूबंदी असल्याने अवैध दारूचे गाळप दारू माफिये करत होते.परवानाधारक दारू दुकाने बंद असल्याने ही व्यावसायिक संधी कॅश करण्याकरिता दारूमाफिया सरसावले होते.त्यामुळे मंठा पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी म्हणून अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार [ता.२३] गुरवार रोजी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास निकम , पोलीस उपनिरीक्षक नितिन गट्टुवार , विजय जाधव यांच्या पथकांनी शहरातील कैकाडी मोहल्ल्यात गुरूवारी संपूर्ण फौजफाटा घेऊन कारवाई करण्यात आली. या धाडीत गुळमिश्रित मोह फुलाचा सडवा असलेले ड्रम पोलिसांनी नष्ट केले.हा सडवा फेकून देण्यात आला.याबाबत अविनाश भगवान गायकवाड , तुळशीराम किशनराव गायकवाड , अंकुश मुक्तीराम गायकवाड या तिघाविरूध्द मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे शहरातील अवैद्य धंदे करणाराचे धाबे दणाणले असुन ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. व नागरिकांनी शहरासह तालुक्यात कुठेही दारू , गुटखा , मटका यासह अवैद्य धंद्ये सुरू असल्यास पोलीसांना माहिती द्यावी. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी सांगितले.

66 Views

Leave a Reply

Your email address will not be published.