…अन चक्क रुग्णवाहिका लांबवली

जालना :परतूर तालुक्यातील श्रेष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातून अज्ञातांनी चक्क रुग्णवाहिका लांबवल्याची घटना घडल्यामुळे आरोग्य यंत्रणेसह पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली.
कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाच श्रेष्ठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातून काल शुक्रवारी रात्री अज्ञातांनी चक्क रुग्णवाहिकाच लांबवल्याने एकच गोंधळ उडाला होता.आरोग्य विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला दिल्यानंतर पोलिसांनी देखील जलदगतीने तपास सुरू केला होता. मात्र आज शनिवारी सकाळी सदर रुग्णवाहिका जालना तालुक्यातील रेवगाव जवळ रस्त्यावर बेवारस आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला असला तरी रुग्ण वाहिका कोनी आणि कशासाठी लांबवली होती हा प्रश्न अनुत्तरित आहे.

27 Views

Leave a Reply

Your email address will not be published.