पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा!

बीड : जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा.ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिम्मित नेकनूर येथे भव्य रक्तदान शिबिर, रुग्णांना फळवाटप, वृक्षारोपण तसेच धनंजय मुंडे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मा. नारायण शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून वै. बंकटस्वामींच्या समाधीचा अभिषेक व दर्गा हजरत सय्यद शाह इब्राहिम शाहिद रहे येथे चादर चढवून प्रार्थना करण्यात आली.

       सध्या सर्वत्र कोरोणाची परिस्थिती असल्याने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. धनंजयजी मुंडे साहेब यांचा वाढदिवस नेकनूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाज उपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने स्त्री रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले सहसा शिबिराचे आयोजन करणारे रक्तदान करताना दिसत नाहीत परंतु मा.नारायण शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून इतरांनीही रक्तदान करण्याचे आवाहन केले.या आवाहनाला प्रीतिसाद देत अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले, त्याच बरोबर वृक्षारोपण करणे काळाची गरज असल्याने वृक्षारोपणही करण्यात आले, रुग्णांना फळ वाटप करण्यात आली.धनंजय मुंडे साहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी वै.बंकट स्वामींच्या समाधीस अभिषेक  व दर्गा हजरत सय्यद शाह इब्राहिम येथे चादर चढवून प्रार्थना करण्यात आली.यावेळी बंकट स्वामी संस्थानचे मठाधिपती ह. भ. प. लक्ष्मण महाराज मेंगडे, रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ. घुगे सर, बाल रोग तज्ञ डॉ.मुंडे सर, याच बरोबर नेकनूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्‍मण केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार तुळजीराम शिंदे, ग्रा.प.सदस्य सय्यद खालेद भाई, हमेद भाई, इजहरुद्दिन जागीरदार, संजय शिंदे,करंडे सर, शिवाजी शिंदे, फुलचंद नागरगोजे, मोइब भाई, अंकुश भस्मे, किशोर कांकर, लालू जागीरदार, हनुमान शिंदे, स्वप्नील शिंदे, सागर शिंदे, धनंजय शिंदे, अक्षय दाईंगडे, शाहरुख शेख सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
137 Views

Leave a Reply

Your email address will not be published.