चारशे गरजू मजुरांना स्वतः च्या शेतातील गव्हाची रास केली वाटप

पाटोदा : कोरोना व्हायरस च्या प्रतिबंधासाठी सरकारने देश लॉकडाऊन केला अन अनेक मजुरांचा हातचा रोजगार गेला .पाटोदा शहरात या मजुरांना राष्ट्रीय काँग्रेसचे ता.अध्यक्ष गणेश कवडे यांनी स्वतःच्या शेतातील २० क्विंटन गव्हाची रास मोफत दान करुन एक स्तुत्य उपक्रम राबवला . कोरोना आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन मध्ये रोजगार नसल्याने  घरातच   बसलेल्या गरीब हॉटेल कामगार, शेतमजुर, बांधकाम मजुर ,घरकाम करणारे मजुर, दुकानात काम करणारे नोकर यांचा रोजगार बुडाला यांच्यासाठी पाटोदा शहरातील दानशुरांनी किराणा दिला .मात्र समाजासाठी सदैव त्यागी वृती असलेले गणेश कवडे यांनी स्वतःच्या शेतातील गव्हाची रासच चारशे नागरिकांना प्रत्येकी पाच किलो प्रमाणे   काँग्रेसच्या मान्यवरांच्या हस्ते वाटप करुन आदर्श निर्माण केला .पाटोदा शहरात गत अनेक दिवसापासून गणेश कवडे यांचे शेतकऱ्यांसाठी व सामाजिक क्षेत्रात मोलाचे काम आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे अनेक गोरगरीब कामगार लाॅकडाऊन मुळे काम सोडून घरातच बसून आहेत. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे या गरीब नागरिकांना राष्ट्रीय काँग्रेसचे ता.अध्यक्ष गणेश कवडे यांनी चारशे (४००) गरीब कुटुंबांना राष्ट्रीय काँग्रेसचे जि.उपाध्यक्ष तथा माजी सरपंच  जुबेर चाऊस यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते उमर चाऊस,गोंविद बामदळे, राहुल बामदळे,पप्पू सवासे,अविनाश सवासे, इम्रान शेख, युवराज जाधव, मुन्ना अन्सार उपस्थित होते. दरम्यान गणेश कवडे यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतूक होत आहे. 

94 Views

Leave a Reply

Your email address will not be published.