नित्याथॅ फॅसिलिटी मॅनेजमेंट संस्थेकडे असलेले आहार पूरवठयाचे कंत्राट तात्काळ रद्द करा :- समाजसेवक सलिम अध्यक्ष

बीड : सध्या बीड शहारतील कोवीड सेंटर मधिल रूग्णांच्या अहाराचा मूद्दा खूप चर्चेतील विषय झाला आहे. समाजसेवक सलिम अध्यक्ष हे कोवीड सेंटर च्या पाहणी साठी गेल्या नंतर आय टी आय मधील व लाॅ काॅलेज कोवीड सेंटर च्या अनेक रूग्णांनी आहाराच्या बाबतीत अनेक तक्रारी समाजसेवक सलिम अध्यक्ष यांच्याकडे केल्या आहेत.
या बद्दल सविस्तर असे की . बीड जिल्ह्य़ातील कोरोना रूग्णांना आहार पूरविण्याचे काम नीत्याथॅ फॅसिलिटी मॅनेजमेंट संस्था नाशिक यांच्या कडे आहे परंतू तो पुरविण्यात येत असलेला आहार अतिशय निकृष्ट दर्जा चा असतो,कधी तर तो आहार रूग्ण न खाताच उपासी पोटी झोपी जातात तर रोजच्या आहारतील शासनाने ठराऊन दिलेल्या तत्कयातील अर्धा आहार, मध,फळे गायब असतात.अशा प्रकारच्या अनेक
तक्रारी स्वत: रूग्णानी व्हीडिओ मध्ये सूध्दा केल्या आहेत. आणि या कारणांमुळे 20 ते 30 टक्के रूग्ण हे सेंटर वर पुरविण्यात येणारा अहार न घेता ज्या रूग्णांचे घर हे प कोवीड सेंटर पासून जवळ आहेत ते रूग्ण घरिऊनच जेवण मागवतात आणि अशा रूग्णांचे बिल सूध्दा संबंधित कंत्राटदार जेवण न देताच लाटण्याचे काम करत आहेत. म्हणूनच या सर्व बाबींची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्य पूर्ण दखल घेऊन संबधित कंत्राटदारची देयके थांबवावी तसेच त्या कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करावे अशी मागणी समाजसेवक सलिम अध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या कडे निवेदना व्दारे केली आहे.

70 Views

Leave a Reply

Your email address will not be published.