नगररचना विभागाकडे कुणी लक्ष देणार आहे का ?चकरा मारुन मारुन जनता ञस्त ,अधिकार्यांचे दुर्लक्ष.

जालना (प्रतिनिधी) योगेश टाकसाळ

लोकांच्या स्वप्नातील घर ऊभारण्यासाठी नगरपरिषदेच्या नगररचना विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. जेमतेम शासन नियमाप्रमाणे पंधरा ते वीस दिवसात बांधकाम परवाना नागरिकांच्या हातात येतो. सध्याच्या घडीला परवाना काढण्याची पध्दत ऑनलाईन असल्यामुळे ही प्रक्रीया जलद होण्यास मदत होते. इंजिनियर मार्फत नागरिक फाईल दाखल करतात ,आणि ती टप्या टप्याने तपासनीसाठी जात असते . ऑनलाईन कारभारामुळे एका क्लिकवर  सगळी फाईल बघता येते आणि ही पध्दत सोपी झाली आहे.

       माञ दोन महीण्यापासुन दाखल केलेल्या बांधकाम परवाण्याच्या फाईल पुर्ण झालेल्या नाहीत आमच्या सुञांकडुन अशी माहीती आली आहे कि गेल्या दोन महिन्यापासून नगर परिषदेला पूर्णवेळ नगर रचनाकार नाही.उंटावरून शेळ्या हाकण्यासारखे  काम या विभागामार्फत चालू आहे असेच  म्हणावे लागेल .  मागील सबमिट केलेल्या फाईल टेक्निकल कारणामुळे परत रीसबमिट कराव्या लागतील असे उडवा उडवीचे उत्तर ऐकण्यास मिळत आहे .दोन महिन्यापासून शासनाने नगररचनाकार यांच्या बदलीचा आदेश काढला होता मात्र त्यावर ते रुजू झाले नाहीत यामुळे फाईलींचे काम तसेच रखडले आहे . काही जणांच्या फाईल अचानक रिजेक्ट झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत . या काळात त्यांनी परस्पर बदली करून घेतली अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे . या गोंधळात नागरिक पुरते हैराण झाले आहे  स्वच्छ सर्वेक्षणात आघाडी मिळवणारी आपली नगर परिषद फक्त नावालाच आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाल्याशीवाय राहत नाही . नागरिकांची गैरसोय होत असताना या विभागावर कुणाचा वचक आहे कि नाही याबद्दल साशंकता निर्माण होते आहे . किमान आतातरी नगरपालिका जागी होईल का हा प्रकर्षाने पडलेला प्रश्न आहे कि फक्त “आंधळं दळतंय नि कुत्र पीठ खातंय अशी गत होणार  ?

108 Views

Leave a Reply

Your email address will not be published.