नगर परिषद फक्त डागडुजी करण्यावर भर देणार काय ?

जालना (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाण पूल मार्गे नूतन वसाहत अंबड चौफुली येथील रस्ता डागडुजी करून व्यवस्थित केल्या जातो. मात्र पंधरा दिवसातच हा रोड पुन्हा उखडला जातोय नागरिक समाधानी एकाच कारणामुळे होतो कि हा रस्ता थोडाफार चांगला होतो आहे. मात्र नगर परिषदेने नागरिकांच्या तोंडावर तसेच डोळ्यावर फेकलेली हि धूळच म्हणावी लागेल . आम्ही खड्डे बुजवले हे पुन्हा आवेशाचं उत्तर पालिकेकडे तयारच असते . मात्र या रोडने जाताना कित्येक जणांना आपले हात पाय मोडून घ्यावे लागले आहेत , कुणाच्या मणक्यात गॅप पडलेला आहे ,कुणाला पाठीचा आजार जडला आहे लोकांना यावर प्रतिक्रिया विचारली तर नगर पालिका झोपलेल्या अवस्थेत असते असे उत्तर अनेक जणांकडून मिळाले आहे . शहरातील इतर रस्ते बनवले असताना मात्र या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्या जातंय अशी बोंबाबोंब नागरिक करत आहे यावर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाय करावा अशी मागणी होत आहे .

प्रतिक्रिया

शीतल शेळके = शहरात भाजीपाला किंवा मार्केट मध्ये जातांना या रस्त्यावर खूप मोठे खड्डे आहेत यामुळे आईला घेऊन जातांना खूप त्रास सहन करावा लागतो . शहरातील इतर रस्त्यांप्रमाणे हा हि रस्ता चांगला करायला हवा ..

दयानंद मुळे = मी ऑफिसला जाताना याच रस्त्याचा वापर करतो गेल्या अनेक वर्षांपासून याच रस्त्याने जाणे येणे असल्यामुळे कधी गाडी खड्यात गेली तर कधी बंद पडली आहे . प्रशासनाने याकडे लक्ष घातले पाहिजे .

84 Views

Leave a Reply

Your email address will not be published.