उच्च न्यालयाच्या आदेशाने गंगाखेड शुगर्स ला गाळपाची परवानगी परळी तालुक्यातील तीन लाख मे.टन ऊसाचा प्रश्न मिटला- राजेभाऊ फड

परळी (प्रतिनिधी) मुख्यमंत्री सहाय्यता निधी व साखर संकलन निधी वेळेवर न दिल्याने साखर आयुक्तांनी गंगाखेड शुगर्स ॲण्ड एनर्जी चा रद्द केलेल्या गाळप परवाना उच्च न्यालयाने रद्द केला असुन तीन दिवसात गाळप सुरु करावे असे आदेश साखर आयुक्तांना दिल्याने गंगाखेड शुगर्सचे गाळप सुरु झाल्याने परभणी,लातुर,हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील ऊसासह परळी तालुक्यातील तीन लाख मे.टन ऊस गाळपाचा प्रश्न मिटला असल्याचे रासपा युवानेते तथा कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांनी यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व साखर संकलन निधी वेळेत न भरल्यामुळे सध्या प्रशासक असलेल्या गंगाखेड शुगर्स ॲण्ड एनर्जी या कारखान्याचा गाळप परवाना दि.12 नोव्हेंबर रोजी साखर आयुक्तांनी रद्द केला होता यामुळे या कारखान्याच्या कर्यक्षेत्रातील 30 हजार मे.टन ऊसाच्या गाळपाचा प्रश्न उभा राहिला होता.गंगाखेड शुगर्सला गाळप परवाना द्यावा यासाठी परभणी जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले होते.हा गाळप परवाना रद्द करण्यामागे राज्य सरकारमधील इतर मंत्र्यासह सामाजीक यांचे षडयंत्र असुन शेतकर्यांच्या ऊसासाठी गंगाखेड कारखाना सुरु करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा आ.रत्नाकर गुट्टे यांनी दिला होता. गाळप परवाना देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी होवुन गंगाखेड शुगर्स ला तीन दिवसात गाळप परवाना द्यावा असे आदेश दिल्यानंतर साखर आयुक्तांनी कारखाना प्रशासनास गाळप सुरु करण्याचा परवाना दिला आहे. @@@@@@@ परळीतील तीन लाख मे.टन.ऊसाचा प्रश्न मिटला – राजेभाऊ फड गंगाखेड शुगर्सचा गाळप परवाना रद्द केल्यामुळे परळी तालुक्यातील कन्हेरवाडी,हाळम,धर्मापुरी,वडगाव (दा.),नागापुर,लोणी आदी गावातील तीन लाख मे.टन ऊसाचा प्रश्न उभा राहिला होता गंगाखेड कारखान्यास गाळप परवाना मिळाल्याने या तीन लाख मे.टन ऊसाच्या गाळपाचा प्रश्न मिटल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असल्याचे रासपा युवानेते तथा कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांनी सांगितले.

222 Views

Leave a Reply

Your email address will not be published.