कोरोनामुळे मंदिर बंद;भाविकांनीच केली परिसराची स्वच्छता

प परळी शहरात नवरोत्रोत्सवास साधेपणाने सुरुवात झाली.डोंगरतुकाई व कालरात्री मंदिर बंद असले तरी भाविकांनी बाहेरुन दर्शन घेतले.वैद्यनाथ देवल कमेटीकडुन मंदिर परिसराची स्वच्छता न केल्याने भाविकच स्वच्छता करत आहेत. परळीची कुलस्वामिनी कालरात्री व डोंगरतुकाई ही दोन्ही मंदिरे वैद्यनाथ देवल कमेटीच्या अधिपत्याखाली येतात.दरवर्षी नवरात्रोत्सवात कमेटीकडुन मंदिर परिसराची स्वच्छता केली जाते.यावर्षी ही मंदिरे बंद असल्याने साधेपणाने घटस्थापना करण्यात आली.मंदिरे बंद असली तरी बाहेरुन दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.परंतु डोंगरतुकाई मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर सर्वत्र अस्वच्छता दिसत आहे.पायर्यावरील वाढलेले गवत तसेच आहे. हे भाविक स्वतःहुन स्वच्छता करत आहेत.मंदिर परिसरात जास्तीची गर्दी होवु नये म्हणुन पोलिस लक्ष ठेवुन आहेत.पुढील नऊ दिवसात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढणार असल्याने कालरात्री व डोंगरतुकाई मंदिर परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी भाविकांतुन होत आहे.

69 Views

Leave a Reply

Your email address will not be published.