उत्तर प्रदेश मधील त्या घटनेचा सीबीआय मार्फत तपास करावा व आरोपीस कडक शासन करावे- प्रा.डॉ.विनोद जगतकर

परळी (प्रतिनिधी) दि.०१- उत्तर प्रदेश हाथरस जिल्ह्यातील ‘मनीषा वाल्मिकी’ वर चार नराधमानी बलात्कार करून तिची जीभ कापून, मनका मोडे पर्यत मारहाण केली असून ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा तपास सीबीआय मार्फत लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी करून सदरील आरोपीस कडक शासन करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष विनोद जगतकर यांनी केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उत्तर प्रदेश हाथरस जिल्ह्यातील ‘मनीषा वाल्मिकी’ वर चार नराधमानी बलात्कार करून तिची जीभ कापून, मनका मोडे पर्यत मारहाण केली. दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती व त्यानंतर ती मृत घोषित केली. उत्तर प्रदेश सरकारने पीडितेची जात पाहू नये, पीडितेवर झालेल्या अन्याय पहावा व न्याय मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील रहावे. अशा गंभीर घटनेविरोधात राष्ट्रीय महिला आयोग तात्काळ आवाज उठवून योग्य पद्धतीने न्याय मिळेल या उद्देशाने सदरील प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात यावे. या सदरील गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात पीडितेस न्याय मिळेल या उद्देशाने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात यावे व पीडितेला न्याय द्यावा या मागणीचे निवेदन ऑनलाइन पद्धतीने बीड जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. विनोद जगतकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले आहे.

162 Views

Leave a Reply

Your email address will not be published.