महादेवरावजी तेलकर एक कुशल संघटक ;रामदास पेंडकर!

नांदेड : कैलास नगर येथे
भावसार सेना सेवा समिती च्या वतीने
थोर समाजसेवक श्री. महादेवरावजी तेलकर यांची 166 वि.जयंती आनंदात, उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम भावसार सेना सेवा समिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदासजी पेंडकर तानुरकर यांच्या शुभ हस्ते महापुरुष श्री महादेवरावजी तेलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी श्री महादेवरावजी तेलकर या महापुरुषाची जयंती ही भावसार समाजसाठी, समाज प्रगतीसाठी साजरी करणे गरजेचे आहे. समाजसेवक श्री माधवरावजी तेलकर यांचा उत्तम आणि कुशल समाज संघटनाचा सर्वोत्तम आदर्श प्रत्येक व्यक्तीने घेऊन, त्यांना राष्ट्रसंत म्हणून घोषित करण्यासाठी आपण सर्वांनी, समाजातील अनेक संघटनांनी एकत्रित येऊन शासनदरबारी पत्रव्यवहार करून शासनाकडून राष्ट्रसंत म्हणून घोषित करून घ्यावे अशी भावना व्यक्त केली. भावसार सेनेच्या वतीने आद्य समाजसेवक श्री.महादेवरावजी तेलकर यांच्या जयंती निमित्त घेतलेल्या गणेशोस्तव व महालक्ष्मी सजावट व देखावा यातुन दिला जाणारा सामाजिक एकते चा संदेश स्पर्धेतील विजेत्यांना भावसार पुष्पहार झेंडा,टोपी, दस्ती व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दहावी बोर्ड परीक्षेत 92 टक्के घेऊन कु. वैष्णवी केदारे अर्धापूर, तसेच
हर्ष प्रदीप सोनवणे 91 टक्के घेऊन घवघवीत यश मिळवल्याबद्द्ल दोन्ही विद्यार्थ्यांचा पत्रकार मुक्ता पेटकर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्पमित्र चंद्रशेखर भागवत यांनी साप आपला शत्रू नसून मित्र आहे हे अनेक उदाहरणानीं स्पष्ट करत विविध विषारी बिनविषारी आणि दुर्मिळ सापांच्या प्रजातिंबद्दल सखोल माहिती देत आपल्या परिसरात साप निघाल्यास 9421766021 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान केले.
राष्ट्रीय कन्यादिनाचे औचित्य साधून मुंबई येथे राहणारी कु. अगस्त्या राजाभोज या पाचवीत शिकना-या मुलीची सौ कल्पना पुर्नाळे यांनी व्हीडीओ कॉन्फरंसीँग द्वारे ऑनलाइन मुलाखत घेतली दरम्यान इंग्रजी माध्यमांत शिक्षण घेत असुनही संस्कृत, हिन्दी, मराठी या विविध भाषाचें ज्ञानासह संस्कृत भगवतगिता मुखपाठ असणा-या अगस्त्याने गिते चा संस्कृत 12वा अध्याय गाऊन दाखवला छोट्याश्या वयात आई वडिलांप्रती कर्तव्यभावना जाणना-या तसेच खेळ, कला शिक्षण अनेक पारितोषिक मिळवणा-या या गोड मुलीचा ऑनलाइन सत्कार उपस्थितच्यां वतीनं करण्यात आला..

याप्रसंगी भावसार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सोनवणे, सचिव अभिषेक ताकझुरे, पत्रकार मुक्ता पेटकर प्राध्यापक निलिमा भायेकर, लघुउद्योग विकास महामंळ नांदेड चे विभागीय लेखाधिकारी श्री प्रफुल्ल जुनगडे, भावसार समाज सिडको नविन नांदेडचे अध्यक्ष विनोद सुत्रावे, युनायटेड भावसार ऑर्गनायजेशन सिडको नविन नांदेड चे अध्यक्ष संजय पेटकर, श्री रमेश पुर्नाळे यांनीही
श्री महादेवरावजी तेलकर यांचे समाजकार्य आणी व्यक्तीमत्वावर विविधअंगी माहिती देऊन महादेवरावजी तेलकर यांचे भावसार समाजा बद्दलचे प्रेम, त्याग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीचे विचार आपल्या सोबत घेऊन समाजासाठी प्रेरणादायी विकासातमक
कार्य साध्य करण्याची शक्ती श्री महादेवरावजी तेलकर या
महापुरुषाच्या जिवनचरित्रात असल्याचे मनोगत एकुणच आप-आपल्या विचारांतून सर्वांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास अविनाश सुत्रावे, ज्योती सोनवणे. संदीप बेंद्रे, चंद्रशेखर बाहेकर, भडके गुरुजी, संतोष मेहत्रे, विनायक भागवत, रवींद्र पेंडकर, इत्यादी उपस्थित होते. सौ कल्पना पुर्नाळे यांनी समाजप्रबोधन गीत सादर करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अभिषेक ताकझुरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

नोट … सोशल डिस्टन्स ठेवून व सॅनिटायझर व मास्कचा वापर करून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे.

93 Views

Leave a Reply

Your email address will not be published.