बीड जिह्यातिल अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करा- पप्पूजी गायकवाड

गेवराई / देवराज कोळे जिल्ह्यात आठवडाभरापासून अतिवृष्टी होत आहे.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष पप्पूजी गायकवाड यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे व बीड जिल्हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना प्रसिद्धी द्वारे केली आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन,ऊस, कापूस व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. सतत मुसळधार पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे सोयाबीन पीक जमिनीवर खरडून गेले.तसेच सततच्या पावसामुळे अवेळीच झाडावर शेंगांना कोंब फुटले आहेत.ओढे व नदीकाठच्या शेतांमधून पुराचे पाणी गेल्यामुळे सुपीक जमीन खरडून गेली आहे.अतिवृष्टीमुळे जायकवाडी धरण तुडूंब भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणांमधून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे.तसेच गोदावरी नदीस पूर आल्यामुळे बीड जिल्ह्यामधील गोदावरी काठावरील शेतजमिनीचे व पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष गेवराई पप्पूजी गायकवाड यांनी केली आहे.

138 Views

Leave a Reply

Your email address will not be published.