*_भारत गंगाधर कळसे, सौ.शामल भारत कळसे,नांदेड यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव_* *_कंट्रोल क्राईम अन्ड इन्फोर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्ट दिला पुरस्कार_*

देगलूर प्रतिनिधी आजीम आन्सारी कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असताना याच लाॅकडाऊच्या काळात भारत कळसे सौ,शामल भारत कळसे या दांपत्यानी मदत नाहीतर आपले कर्तव्य समजून आपणासही समाजाचे काही देणे लागते या भावनेतून लाॅकडाऊच्या संकट काळात कुठलीच प्रसिध्दी न करता आपले अमुल्य योगदान दिले. नेहमीच ते आपले कर्तव्य समजून गेल्या कित्येक वर्षांपासून समाजउपयोगी मदत कार्यात सहभाग नोंदवून मोलाचे कार्य करतात कार्यकुशलतेने सेवेची भुमिका बजावणाऱ्या या कळसे दांमपत्यांला कंन्ट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्टच्या वतीने ऑनलाईन पुरस्कार यामध्ये यांना कोवीड-१९ योद्धा विशेष सन्मानपत्र ट्रस्ट चे जिल्हा प्रमुख शिवानंद पांचाळ यांनी देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार समाज सेवक साहित्यिक व ईतर बांधव भगिनीं यांच्या मुळे आपण सर्वजण सुखरूप आहोत अशा कोरोना योद्धाचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे, असे मत ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर आमच्या वृत्तपत्राशी बोलतांना व्यक्त केले,यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे

115 Views

Leave a Reply

Your email address will not be published.