शेती पिकांचे नुकसान भरपाई द्या.अन्यथा उपोषन करण्यात येईल नुकसान ग्रस्त शेतक-याने दिला ईशारा

कुंडलवाडी प्रतिनिधी चिरली येथील लाहान पुलाच्या संबंधीत गुत्तेदारमार्फेत अर्धवट बांधकाम झाल्यामुळे नदी परीसरात अनेक शेतक-यांचा शेतात पाणी शिरल्याने शेती पिकांचे नुकसान झाले तरी संबंधीत गुत्तेदारावर योग्य ते कार्यवाही करून शेतक-याना नुकसान भरपाई देण्यात यावे अन्यथा तहसिल कार्यालयासमोर उपोषन करण्यात येईल असा ईशारा नुकसान ग्रस्त शेतक-यातर्फे बिलोली तहसीलदार यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले की मौजे चिरली ते जारीकोट रसत्यावरील पुलाचे बांधकाम अर्धवट झाले असल्यामुळे पावसाचे पाणी शेतीमध्ये घुसुन पिकाचे नुकसान झाले आहे .त्या मुळे त्या गुत्तेदारावर योग्य ते कार्यवाही करून शेतक-याना नुकसान भरपाई मिळवून देणे अन्यथा तहसिल कार्यालया समोर उपोषन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनावर विठ्ठल गंगाधर खरबाळे,कैलास गंगाधर खरबाळे,धनश्री विठ्ठल खरबाळे बालाजी प्रभाकर कदम,जयराम पिराजी सुर्यवंशी,माणिक शंकर धुप्पे,मालिक गंगाधर भिमराव चव्हाण,प्रल्हाद दिगांबर चव्हाण आदींचा स्वाक्ष-या आहे.

174 Views

Leave a Reply

Your email address will not be published.