लॉकडाऊन असलेल्या सहा शहरात बँक व पोस्टाचे अंतर्गत कामकाजास ; आणि घाऊक व्यापाऱ्यांना माल उतरून घेण्यास परवानगी !!

बीड : जिल्ह्यात कोरोना (Covid-19 )विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून बीड, माजलगाव, परळी., अंबाजोगाई, आष्टी व केज या शहरातील सर्व बँकांना लॉकडाऊन कालावधीमध्ये बँक व पोस्टाचे दैनंदिन अंतर्गत कामकाज करणेस आणि घाऊक व्यापाऱ्यांना आलेला मालक उतरून घेण्यास परवानगी देण्यात येत आहे असे आदेश प्रवीण धरमकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी हे आदेश दिले आहेत.

बीड, माजलगाव, परळी वै.., अंबाजोगाई, आष्टी व केज या शहरातील सर्व बँकांना लॉकडाऊन कालावधीमध्ये बँकेचे दैनंदिन अंतर्गत कामकाज करणेस परवानगी देताना यासाठी सर्व बँक अधिकारी , कर्मचारी यांनी त्यांच्या ओळखपत्राचा वापर करावा. त्याच प्रमाणे पोस्ट विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील त्यांचे शासकीय ओळखपत्र आधारे पोस्टाचे दैनंदिन अंतर्गत (Internal) कामकाज करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

सर्व घाऊक व्यापारी (होलसेलर्स) यांना त्यांचा आलेला मालक उतरून घेण्याची परवानगी देण्यात येत आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार कोरोना (Covid-19 )विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दि.31 ऑगस्ट,2020 रोजीपर्यंत बीड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144(1)(3) तीन रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू करण्यात आलेले आहेत. या आदेशाची अवाज्ञा करणार्‍या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने आर्थिक दंड संहिता 1860 (45) यांच्या कलम 188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि इतर कलमांसह दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सूचित केले आहे

119 Views

Leave a Reply

Your email address will not be published.