बँक ऑफ बडोदा जालना शाखेकडून करोनाला आमंत्रण!

बँक समोर ग्राहकाची झुंबड, सोशल डिस्तन्सचा फज्जा
जालना/आनंद शिंदे

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्याकडून मागील सहा महिन्यापासून लॉकडाऊन (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. परंतू काही नियमांचे पालन करून लॉकडाऊन हटविण्यात आले. परंतू जालना शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होत असून याकडे शाखा व्यवस्थापकांचे दुर्लंक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
बँक ऑफ बडोदा जालना शाखेमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी होत असून यामध्ये कुठल्याच प्रकारचे सोशल डिस्टांसचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. या सर्व प्रकाराकडे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी लक्ष देऊन अधिकार्‍यांना चाप द्यावा अशी मागणी आता जनतेतून होत आहे. 

54 Views

Leave a Reply

Your email address will not be published.