अव्यक्त शब्दसिंधु या समूहाचे मराठी साहित्य मार्गदर्शन उपक्रम

अव्यक्त शब्द सिंधू” या समूहाचे अध्यक्ष डॉ. मनोज सूर्यवंशी यांनी दिलेल्या शब्दानुसार पुन्हा एकदा सह मान्यवरांना सोबत घेऊन आगळा वेगळा असा उपक्रम नवोदितां साठी राबविण्यात येणार आहे. त्यातूनच नवोदित साहित्यिकांना एक सुंदर व्यासपीठ मिळवून देण्याचे काम अव्यक्त शब्दसिंधु हा समूह करतो आहे. येत्या रविवारी म्हणजे दिनांक 26 जुलै 2020 रोजी सर्व नवोदितांसाठी “साहित्य मार्गदर्शन” हा नवीन उपक्रम राबविला जाणार आहे.ज्यामध्ये मराठी साहित्याचे शक्य तेवढे मार्गदर्शन करण्यात येणार आहे, तसेच साहित्य क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या नवोदित साहित्यिकांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी मान्यवर मा.प्रा.जयप्रकाश सर यांच व्याख्यान/मार्गदर्शण घेण्यात येणार आहे. त्यामध्ये कविता, त्यांचे प्रकार, गझल, अभंग तसेच काव्य सादरीकरण या संबंधी माहिती देण्यात येणार आहे. समूहातील कार्यकर्त्यांच्या मते सर्व नवोदीतांच्या अडचणी विचारात घेतल्या जाणार असून त्यासाठी मान्यवरांकडून वेगवेगळ्या विषयांवर संवाद होणार आहेत. अव्यक्त शब्द सिंधू या समुहामुळे अनेक नवोदितांना स्वतःचे हक्काचे व्यासपीठ मिळत आहे तसेच तिथे राबविण्यात येणाऱ्या नव नवीन उपक्रमांमुळे त्यात सहभागी होणाऱ्या लेखकांचाही दर्जा उंचावत आहे. “अव्यक्त शब्द सिंधू” हा समूह इथून पुढे सुद्धा असेच दर्जेदार उपक्रम राबवत राहील आणि त्यासाठी संपूर्ण टीम अहोरात्र मेहनत घेत आहे असे नमूद करण्यास अध्यक्ष डॉ. मनोज सूर्यवंशी यांणी कळवले आहे, अणि साहित्य क्षेत्रातले पडद्याच्या माघुन काम करणारे कवियत्री-दीपाली खामकर अणि कवी -विक्रांत शेवारे यांचेही आभार

51 Views

Leave a Reply

Your email address will not be published.