भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीवर बद्रीनाथ पठाडे

जालना (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीच्या सदस्यपदी बद्रीनाथ मारोती पठाडे यांची नियुक्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे व माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, जिल्हाध्यक्ष आ. संतोष पाटील दानवे, आ. नारायण कुचे यांच्या शिफारसीवरून सदर निवड करण्यात आली असून बद्रीनाथ पठाडे हे भाजपाचे गेल्या तीस वर्षापासून भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून त्यांनी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, जि. प. सदस्य व जिल्हा परिषद उपाध्यक्ष, भाजपा जिल्हा सरचिटणीस आदी पदे भुषविली असून त्यांच्या कार्याची दखल घेवून केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांनी भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीवर सदस्य म्हणून निवड करण्यासाठी शिफारस केली होती. श्री पठाडे यांच्या निवडीबद्दल भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.  

159 Views

Leave a Reply

Your email address will not be published.