काजी-ए- परळी शहर ईसामोद्दीन महेबूबोद्दीन काजी यांचे निधन

परळी (प्रतिनिधी) : येथील शहराचे मुख्य काजीचे काम पाहणारे काजी इसामोद्दीन महेबूबोद्दीन यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. शहर-ए- काजी या पदावर गेल्या साठ वर्षापासून ते काम पाहत होते. त्यांनी अविरतपणे काजी-ए- शहर म्हणून सामान्यांना सेवा दिली. काजी ईसामोद्दीन यांचा जन्म २६ डिसेंबर १९३४ साली झाला. त्यांनी बी. कॉम ही पदवी हैदराबाद येथून उत्तीर्ण केली होती. त्यांचे ८५ व्या वर्षी गुरुवारी निधन झाले. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू व मितभाषी असा होता. समाजातील नागरिक त्यांचा आदर करायचे. त्यांच्या पश्चात पाच मुले व चार मुली असून नातवंडा सहीत असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परळी शहर एका चांगल्या व्यक्तिमत्वास मुकला आहे. त्यांचा दफनविधी गुरुवारी झाला.

304 Views

Leave a Reply

Your email address will not be published.