माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू

परभणी शहरातील उड्डाणपुलावर दुचाकी च्या अपघातात भाजपचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.नेमका हा अपघात कसा झाला याची कुणालाही कल्पना नाही. माजी आमदार मोहन फड यांचा लहान मुलगा पृथ्वीराज फड हा मुंबईत शिकतो,लॉक डाऊन मागच्या काही दिवसांपासून तो परभणीत होता आज संध्याकाळी पावणे नऊ च्या सुमारास पृथ्वीराज हा त्याची स्क्रॅमलर डुक्याटी या मोटारसायकल वरून गंगाखेड रस्त्याकडे जात असताना उड्डाणपुलावर त्याचा अपघात झाला त्यात तो गंभीर जखमी झाला होता यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला तातडीने जील्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र उपचार पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली व फड कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात पोचले असुन त्यांच्या वर या अपघाताने मोठा आघात झालाय.. नेमका अपघात झाला कसा? संध्याकाळी पृथ्वीराज हा गंगाखेड रस्त्याकडे जात असताना हा अपघात झाला ज्यात अत्यंत महागडी असलेली त्याच्या बुगाटी कंपनीची दुचाकी समोरून पूर्णपणे चकनाचुर झाल्याने हा एवढा गंभीर अपघात नेमका कुठल्या वाहना बरोबर झाला हे मात्र कुणालाही कळु शकले नाही कारण घटनास्थळी केवळ दुचाकींच पडलेली होती त्यामुळे त्या वाहनाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे..

2,321 Views

Leave a Reply

Your email address will not be published.