शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष सुरज गोविंदराव तेलंगे यांचा वाढदिवस साजरा.

लोहा (प्रतिनिधी). लोहा तालुक्यातील बोरगाव अ येथील शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष सुरज गोविंदराव तेलंगे यांनी स्वतः चा वाढदिवस जगावर निर्माण झालेल्या कोरोणा संकटामुळे सामाजिक बांधिलकी जपत अगदी साध्या पध्दतीने विविध सामाजिक कार्यक्रम करून त्यात पोलिस कर्मचारी.डॉक्टर,सफाई कर्मचारी यांचा कोरोणाविर प्रमाणपत्र ,सँनिटायझर, मास्क भेट देऊन छोटासा गौरव केला,गावातील किराणा दुकानदाराला सँनिटायझर व मास्क वाटप तसेच पर्यावरण संतुलन चांगले रहावे म्हणुन व्रक्षारोपण करुन स्वतः चा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी गावचे पोलीस पाटिल रमेश पाटिल,प्रतिष्ठाण चे सचिव माधव गोपाळराव तेलंगे,कोषाध्यक्ष सिध्देश्वर एडके,रोहित आंबेगावे,क्रष्णा तेलंगे,सचिन बारसोळे आदि उपस्थित होते

121 Views

Leave a Reply

Your email address will not be published.