सूर्यावर थुंकू नका, डिपॉझिट अन अस्तित्व टिकून राहिल हे बघा ; धनंजय मुंडेंनी पडळकरांना सुनावलं

बीड : राजकारणात नेम आणि फेम मिळवायचा असेल कि शरद पवार साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण जीभ उचलून टाळ्याला लावत उचापती करतात . भाजपाने दिलेल्या आमदारकीची परतफेड करण्यासाठी वायफळ बडबड केली जाते .असे सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!अश्या शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला . भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली होती टीका

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पडळकरांचा समाचार घेतला जात असून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी “शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवताय. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला शरद पवारांनी इथपर्यंत आणलं आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.
तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातून प्रतिक्रिया देताना म्हटले कि मंडल आयोग,नामविस्तार, बहुजनांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून मा.शरद पवार साहेबांनी आम्हा बहुजनांच्या आयुष्याचं सोनं केलं हे महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही.पण भाजपने दिलेल्या आमदारकीची परतफेड करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना वायफळ गोष्टी कराव्या लागतात हे वाईट वाटतं. राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!

38 Views

Leave a Reply

Your email address will not be published.