कायद्याचा धाक ओसरल्याने व पोलीसांसोबत अर्थपुर्ण व्यवहार केल्याने छेडछाड प्रकरणातील आरोपी संतोष पंनखुले फिरतो 12 तासात खुलेआम

पोलिस अधिक्षक साहेब माझ्या पिडीत मुलीला न्याय मिळेल का? पिडीताच्या वडीलाची तक्रार
जालना (प्रतिनिधी) –
मागील अनेक दिवसांपासून मौजपुरी पोलिस ठाण्याच्या हाद्दीत वांरवार एक ना अनेक प्रकरणे उघडे पडू लागले असल्याने या परिसरातील नागरीकांतून खाकीवर आता प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे. असेच प्रकरण दि. 16 जून रोजी भाटेपुरी येथे रहिवाशी असलेल्या गोरे वय 25 वर्षे यांच्यासोबत वाईट हेतूने घरात घुसून छेडछाड केल्याची घटना घडली. सदरील महिला ही गरोदर असल्याने तीच्यासोबत झालेल्या छेडछाडीमुळे त्या महिलेस जालना येथील शासकीय रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू येथील डॉक्टरांनी देखील या महिलेच्या नातेवाईकांना काहीही न सांगता कुठलाच रिपोर्ट अद्याप दिलेला नाही. मात्र त्या प्रकरणातील आरोपी संतोष सखाराम पंनखुले हा चक्क बारा तासात पोलिसांशी अर्थपुर्ण व्यवहार करून व राजकीय दबाव टाकून मोकाट सुटतो ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, आरोपीविरूद्ध 354, 354-ए, 452, 323 या कलमांन्वे गुन्हा दाखल करण्यात आला असतांना देखील दहा ते बारा तासाच्या आता पोलीसांनी सोडून दिल्याने भाटेपूरी व मौजपुरी परिसरात सर्व सामान्य नागरीकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्‍वास उडाला आहे. कायद्याचा धाक न राहिल्याने हा मोकाट आरोपी पुन्हा राजरोस गावात प्रतिष्ठीत नागरीकांसारखा फिरत असल्याने तक्रारदार व त्यांच्या कुटूबियांना या आरोपीपासून धोका निर्माण होऊ शकतो. असे जिल्हा पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदरील घटनेची तक्रार मौजपुरी पोलीस ठाणे येथे दिल्यानंतर आरोपीला तात्काळ अटक होने अपेक्षीत होते. मात्र गरीबाला न्याय देतील त्यांना पोलीस कसे म्हणायचे, लॉकडाऊनच्या काळात अनेक गुटखा, मटका किंग, अवैध दारू विक्री मौजपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे सुरू आहे.  मात्र गावातही माणूसकीहीन पंच कमिट्या निर्माण झाल्याने दाद मागण्यासाठी पोलिस ठाण्यात यावे लागते. पोलिस ठाण्यात न्याय मिळेल या अपेक्षेने तक्रार दिली जाते. मात्र त्या तक्रारीच्या अनुषंगाने आरोपीकडून अर्थीक व्यवहार करून आरोपींना राजरोसपणे मोकार सोडण्याचे काम मौजपुरी पोलिस स्टेशन अंतर्गत बर्‍याच दिवसांपासून चालु आहे. 

596 Views

Leave a Reply

Your email address will not be published.