आष्टी तालुक्यात युवकाचा खून ; एक आरोपी ताब्यात !!

घटनास्थळी पोलीस अधीक्षकांची भेट

आष्टी : आमच्या जावई व सासरवाडीच्या विरोधात अपशब्द का बोलला याचा जाब विचारण्यासाठी कल्याण सोनबा खिळे, राजू रावसाहेब खिळे, परसराम रावसाहेब खिळे, सुरेश कल्याण खिळे, योगेश कल्याण खिळे या
पाच जणांच्या टोळक्याने कानडी बुद्रुक येथील चोपन्नवस्ती येथील दादा खिळे यास मारहाण केली, त्यानंतर संजय वळवळे याच्या घरी जाऊन त्यास काठ्या, दगड, विटा , लाथा बुक्क्याने पोटात, छातीवर, तोंडावर जबर मारहाण केली. या मारहाणीत संजय चा जागीच मृत्यू झाला.
ही घटना मंगळवार दि.9 रोजी सकाळी 8 च्या दरम्यान आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

या विषयी अधिक माहिती अशी की, फिर्यादी अशोक राजाराम खिळे यांचे जावई संजय वळवळे व दादा खिळे हे दोघे सोमवार दिनांक 08 रोजी एकत्र बसून गप्पा मारत होते. यावेळी संजय वळवळे याने आरोपीचे जावई रामेश्वर घुले याला फोन लावला. त्यावेळी त्या दोघांत फोनवर संभाषण सुरू असताना त्याचवेळी दादा खिळे संजयला म्हणाला, तुझ्यात सासरवाडीला जाण्यात दम आहे का, पण फोन चालू असल्यामुळे घुले यांचा गैरसमज झाला की, दादा खिळे हा मलाच म्हणाला असा समज झाल्याने रामेश्वर घुले याने आपले सासरवाडीच्या लोकांना सांगितले की, दादा खिळे व संजय वळवळे हे दोन व्यक्ती सासरवाडीबद्दल अपशब्द बोलले असून त्या दोघांकडे बघा असे मोबाईलवरून आरोपींना सांगितले. या गोष्टीचा राग धरून जाब विचारण्यासाठी आरोपी संजयच्या घरी गेले. यावेळी वाद झाला आणि संजयला विटा, काठी, दगड व लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली. छातीत विटा व दगडांचा जोराचा मार लागल्याने संजयचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक विजय लागारे,निरीक्षक माधव सुर्यवंशी आदींनी घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी कल्याण सोनाबा खिळे याला ताब्यात घेण्यात आले असून राजू रावसाहेब खिळे, परसराम रावसाहेब खिळे, सुरेश कल्याण खिळे, योगेश कल्याण खिळे हे घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पुढील तपास माधव सुर्यवंशी हे करीत आहे.

195 Views

Leave a Reply

Your email address will not be published.