पुरोगामी पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी विनोद काळे यांची फेर निवड

सिंधीकाळेगाव ( प्रतिनिधी) –  महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी दैनिक मराठवाडा साथीचे उपसंपादक विनोद काळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक – अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी ही निवड केली आहे.      महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचा कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्रातही विस्तार झालेला आहे. पुरोगामी पत्रकार संघ हे राज्यातील पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारे मजबूत संघटन आहे. दरम्यान, येथील पत्रकार विनोद काळे यांची जालना जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड नुकतीच करण्यात आली आहे. श्री. काळे हे मागील सोळा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन संघटनेचे संस्थापक – अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी काळे यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड केली आहे. पुढील काळात जालना जिल्ह्यातील पत्रकारांची मोट बांधून संघटनेची पाळेमुळे मजबूत करण्याची जबाबदारी श्री. काळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.   या निवडीबद्दल पत्रकार विनोद काळे यांचे अध्यक्ष विजय सुर्यवंशी , कार्याध्यक्ष डॉन के.के., उपाध्यक्ष  प्रवीण परमार, कोषाध्यक्ष राजाराम माने, सचिव डॉ. सुरेंद्र शिंदे, सल्लागार बाळासाहेब अडांगळे, कोअर कमिटीचेप्रदेशध्यक्ष विनोद पवार .  उपाध्यक्ष प्रा .दशरथ वैजनाथ रोडे, विलास पाटील, प्रतिमा परदेशी, कैलास गडदे, संतोष परदेशी, प्रकाश चीतळकर, सुभाष परदेशी, सुनील चौधरी, छोटुलाल मोरे, कृष्णा भेडसे, संजय रुपनर, सचिन जाधव, सतीश परदेशी, हेमलता परदेशी ,साबीर बागवान, प्रल्हाद पाटील, विदर्भ विभागाचे  अध्यक्ष डॉ .प्रशांत गुरव आदी पदाधिका-यांच्यावतीने अभिनंदन  करण्यात आले.

112 Views

Leave a Reply

Your email address will not be published.