नेकनूर हद्दीत महिलेचा खून

नेकनूर हद्दीत खळबळ जनक घटना
जावायाने केला सासूचा खून
प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह पुरला

नेकनूर : मुलीच्या घरी मांडवखेल येथे आलेल्या 40 वर्षीय महिलेचा खून करून प्रेत पुरले होते. या घटनेला तोंड फुटले असून हरवल्याची तक्रार असलेली या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरील महिलेचे प्रेत बाहेर काढण्यासाठी बीडचे तहसीलदार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत, नेकनूरचे सपोनि.लक्ष्मण केंद्रे हे घटनास्थळी दाखल झाले आहे.
पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, बीड येथील अंकुशनगर भागातील अलका हनुमंत जोगदंड (वय 40) असे मयत महिलेचे नाव आहे. सदरील महिलाना दि.2 जुन रोजी बेपत्ता असल्याची फिर्याद पतीने नेकनुर पोलिसात दिली होती. सदरील महिला ही जावई यांच्या घरी मांडवेखेल येथे आली होती. तिचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहिती असून याप्रकरणी जावई आणि त्यांच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

67 Views

Leave a Reply

Your email address will not be published.