लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन…!

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी ऊसतोडणी मजुरांसाठी जीवनभर संघर्ष करणारे माजी उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या रूपाने महाराष्ट्राला संघर्षशील लोकनेता, दिलदार विरोधी पक्षनेता लाभला.श्री. पवार म्हणाले, सत्तेत किंवा विरोधी पक्षात असताना त्यांनी नेहमी राज्याच्या हिताची भूमिका घेतली. आज महाराष्ट्र ‘कोरोना’संकटाशी लढत असताना त्यांची उणीव निश्चित भासत आहे. कष्टकरी, सामान्य जनतेसाठी स्व.मुंडे यांनी दिलेलं योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. संघर्षनायकाला विनम्र अभिवादन.

203 Views

Leave a Reply

Your email address will not be published.