जाफ्राबादेत आढळला एक पॉझिटिव्ह रुग्ण ; जाफ्राबाद शहर 3 दिवस बंद…!

तालूक्यातील 3 ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु
टेंभुर्णी : जाफ्राबाद शहरात आज एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 4 झाली आहे.संभाव्य संसर्ग लक्षात घेता 3 जून ते 5 जून जाफ्राबाद शहर बंद ठेवण्यात येणार आहे.संबंधितांच्या संपर्कातील 8 जणांना जाफ्राबाद येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्या लाळेचे नमुने ही तपासणी साठी पाठवण्यात आले आहे.याविषयी अधिक माहिती अशी कि जाफ्राबाद आगारात कार्यरत एक चालक जालना येतून मध्यप्रदेश मधील नागरिकांना सोडण्यासाठी गेले होते, सदर व्यक्ती 16 मे रोजी परत आल्यावर 30 मे रोजी त्यांना सर्दी,ताप आदी लक्षणे आढळून आली.जाफ्राबाद शहरातील एका खाजगी रुग्णालात उपचार घेतल्यावर सदर व्यक्तीला जालना येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करून संबंधितांच्या लाळेचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले होते.सदर व्यक्तीचा अहवाल मंगळवारी 2 रोजी प्राप्त झाला.यापूर्वी 22 मे रोजी टेंभुर्णी येथील एका मुंबई रिटर्न महिलेचा तर हिवराकाबली येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.याशिवाय सदर व्यक्तीच्या संपर्कातील एका मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.टेंभुर्णी येथील बाधीत महिलेचा दुसरा अहवाल 2 दिवसांपूर्वी निगेटिव्ह आल्याने ती कोरोनामुक्त झाली असून आजरोजी तालुक्यातील 3 जणांवर उपचार सुरु आहेत.
जाफ्राबाद 3 दिवस बंद
कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे 3 ते 5 जून असे 3 दिवस जाफ्राबाद शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तहसीलदार सतिश सोनी,पोलीस उपनिरीक्षक अभिजीत मोरे यांच्या प्रमुख उपस्तिथीत संपन्न बैठकीत जाफ्राबाद शहर पुढील 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्तिथ होते.

51 Views

Leave a Reply

Your email address will not be published.