माजी सैनिक एन डी पठाण यांचे निधन

आष्टी : तालुक्यातील सुलेमान देवळा येथील पत्रकार पठाण शाहनवाज यांचे वडील माजी सैनिक नुरमोहम्मद पठाण यांचे राहत्या घरी दि 1 जून पहाटे 6 वाजता ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सुलेमान देवळा येथील शेतकरी कुटुंबात 11 मे1952 रोजी जन्मलेल्या नुरमोहम्मद पठाण हे वयाच्या आठराव्या वर्षी देशसेवेसाठी भारतीय सैन्यात मराठा लाइट इन्फंट्री बटालियन बेळगाव येथे भरती झाले.सैन्यात सुबेदार या पदावर कार्य करणारे ते गावातील पहिलेच सैन्य अधिकारी होते. २२ वर्ष देशसेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू असा होता व गावात सर्व त्यांच्याशी आदराने वागत .लाहनांपासून मोठ्यांपर्यंत सवर्च त्यांना बडेअब्बा नावाने ओळखायचे.वयाच्या 68 व्या वर्षी ह्रदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.त्यांच्या अशा अचानक जान्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

145 Views

Leave a Reply

Your email address will not be published.