पालकमंत्री टोेपे यांच्या प्रयत्नामुळे घनसावंगी शहराचा पाणीप्रश्‍न कायमचा सुटला – नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता देशमुख

घनसावंगी (प्रतिनिधी) – घनसावंगी शहरांमध्ये शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. जनतेच्या अडीअडचणी ओळखून पालकमंत्री राजेश टोपे यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी व एक्सप्रेस फिटर साठी 25 लाख रुपयाचा निधी शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नगरपंचायतला दिला होता. त्या  एक्सप्रेस फिडर्स चे काम पूर्ण झाले असून नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता राज देशमुख यांच्या हस्ते  उद्घाटन होऊन एक्सप्रेस फिटर 1 जून 2020 रोजी कार्यान्वित झाले आहे.यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता राज देशमुख म्हणाल्या की, पालकमंत्री ना. राजेश  टोपे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे घनसावगी शहराचा कायमस्वरूपी पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. या एक्सप्रेस फिटर मुळे शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी 24 तास वीज उपलब्ध राहणार असून शहरांमध्ये कुठेही  पाण्याची कमतरता राहणार नाही. यावेळी  मुख्यधिकारी श्री विक्रम मांडुरके, राज देशमुख, शाखा अभियंता  नागरे ,उपनगराध्यक्ष  नवाब भाई,नगरसेवक श्याम  धाईत,नगरसेवक  सतीश चव्हाण उपस्थित होते.

107 Views

Leave a Reply

Your email address will not be published.